आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिन्नरच्या प्रांताधिकाऱ्यांना राष्ट्रवादीचे निवेदन:एक लाख केशरी शिधापत्रिकाधारक धान्य लाभापासून वंचित, 12 ला माेर्चा

मालेगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील एक लाखाहून अधिक केशरी शिधापत्रिकाधारक शासकीय धान्याच्या लाभापासून वंचित आहे. राज्यात अनेक ठिकाणी ५९ हजारांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या केशरी कार्डधारकांना धान्याचा लाभ मिळत आहे. याच धर्तीवर शहरातील केशरी कार्डधारकांना धान्याचा लाभ द्यावा, अन्यथा १२ डिसेंबरला अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा काढण्याचा इशारा राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार आसिफ शेख यांनी दिला आहे.

शेख यांनी शुक्रवारी दुपारी प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांची शिष्टमंडळासह भेट घेत निवेदन सादर केले. शहरात ४० ते ५० हजार कुटुंबे दारिद्रयरेषेखाली जीवन जगत आहेत. माेठ्या प्रमाणावर गाेरगरीब नागरिक जगण्यासाठी दैनंदिन संघर्ष करत आहे. साधारण एक लाखापेक्षा अधिक केशरी कार्डधारकांची संख्या आहे. या कुटुंबांना शासकीय धान्याचा लाभ मिळत नाही. त्यांचे वार्षिक उत्पन्न ५९ हजारांच्या आत आहे. अशा गरीब कुटुंबांना धान्य मिळणे गरजेचे आहे. शासनस्तरावरून या कुटुंबांना धान्य देण्याची कार्यवाही झाली पाहिजे. यासह नागरिकांकडील शिधापत्रिका जीर्ण झाल्या आहेत.

या शिधापत्रिका नवीन तयार करून द्याव्यात, शिधापत्रिकेतील नावे समाविष्ट करणे व वगळण्याची ऑनलाइन प्रक्रिया तातडीने सुरू करावी, धान्य दुकानातून मिळणाऱ्या धान्याची रीतसर पावती मिळावी, अंत्याेदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थींना डिसेंबर महिन्यापासून नियमित साखर दिली जावी, मागण्या ११ डिसेंबरपर्यंत पूर्ण कराव्यात, अन्यथा १२ डिसेंबरला दुपारी ३ वाजता नागरिकांसह माेर्चा काढला जाईल, असे शेख यांनी सांगितले.

शहरातील धान्य दुकानांच्या संख्या वाढवा शहराच्या लाेकसंख्येचा विचार करून धान्य दुकानांच्या संख्येत वाढ करण्याची मागणीही शेख यांनी निवेदनात केली आहे.

बातम्या आणखी आहेत...