आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील शिवडा-बोरखिंड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे पुरस्कृत आपला पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले. विरोधी माजी आमदार राजाभाऊ वाजे गटाच्या जनसेवा पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही. गत पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार राजाभाऊ वाजे गटाने सर्व जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत आमदार कोकाटे गटाने त्याची परतफेड करत गत निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढले.
आपला पॅनलचे सरपंच प्रभाकर हारक, पंचायत समितीचे माजी सभापती अरुण हारक, उत्तम हारक, नंदू हारक, मधुकर हारक, तेजस वाघ, अनिल वाघ, भगवान वाघ, बोरखिंडचे सरपंच गणेश कर्मे, रावसाहेब हारक यांनी नेतृत्व केले. सर्वसाधारण गटात चंद्रभान चव्हाणके (२१४), भाऊसाहेब माळी (२३२), सोमनाथ वाघ (२४४), पोपट सोनकांबळे (२३५), अनिल हारक (२६६), अण्णा हारक (२२८), किरण हारक (२४०), भाऊसाहेब हारक (२४०) हे विजयी झाले.
तर जनसेवा पॅनलचे विठोबा आनंदा चव्हाणके, किसन वाघ, अरुण हारक, उत्तम हारक, दिगंबर हारक, दिलीप हारक, नारायण हारक, संजय हारक यांना मोठ्या फरकाने पराभव पत्करावा. महिला राखीव गटात लंकाबाई बाळू जुंदरे (२६१), चंद्रभागा पंढरीनाथ हारक (२४४) यांनी यमुनाबाई अशोक हारक (१८४), शिलाबाई काशिनाथ हारक (१७६) यांचा पराभव केला. अनुसूचित जाती जमाती गटातून विलास पाडेकर (२६५) यांनी काळू कवटे (१६८) यांचा पराभव केला. इतर मागास प्रवर्गातून अनिल दशरथ शेळके विजयी झाले. भटक्या विमुक्त जमाती गटातून लक्ष्मण महादू वाघ यांनी विजयश्री खेचून आणली. आपला पॅनलच्या विजयासाठी जगदीश परदेशी, बुधाजी कातोरे, निवृत्ती शिंदे, दीपक शेळके, नीलेश सोनकांबळे, काशीनाथ चव्हाणके, मधुकर चव्हाणके, दिनकर चव्हाणके, साहेबराव चव्हाणके आदींसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.