आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहरण:कांदा व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण,नंबरप्लेट नसलेल्या मारुती ओम्नी गाडीतून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी केले अपहरण

सिन्नरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील काळेवाडा परिसरातून कांदा व्यापाऱ्याच्या १० वर्षीय मुलाचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याची घटना गुरुवारी घडली. चिराग तुषार कलंत्री (१०, रा. काळेवाड्याजवळ, वावी वेस, सिन्नर) असे अपहृत बालकाचे नाव आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तुषार सुरेश कलंत्री हे कांदा व्यापारी असून काळेवाडा परिसरात कुटुंबियांसमवेत वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा चिराग नवजीवन डे स्कूलमध्ये पाचवीत शिकतो. काल सायंकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास चिराग हा काळेवाड्याजवळील बोळीत काही मुलांसमवेत खेळत असताना सफेद रंगाच्या नंबरप्लेट नसलेल्या मारुती ओम्नी गाडीतून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी चिरागचे अपहरण करून ते पसार झाले. याप्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे समजते.

बातम्या आणखी आहेत...