आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोळगावमाळ विविध कार्यकारी सोसायटीवर माजी आमदार राजाभाऊ वाजे, युवानेते राजेश गडाख यांच्या समर्थकांच्या पीरसाईबाबा पॅनलने सर्व १३ जागांवर दणदणीत विजय मिळवला. आमदार माणिकराव कोकाटे समर्थकांच्या जनसेवा शेतकरी पॅनलला एकही जागा मिळाली नाही.
अंबादास कदम, किरण चंद्रे, शशिकांत कदम यांनी पीरसाईबाबा पॅनलचे नेतृत्व केले तर बंडू कुमावत, सर्जेराव चंद्रे, मल्हारी कदम यांनी जनसेवा शेतकरी पॅनेलचे नेतृत्व केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कैलास सोनवणे यांनी काम पाहिले. सर्वसाधारण गटात पीरसाईबाबा पॅनलचे अंबादास कदम (१४५), केशव कदम (१४९), रामनाथ कदम (१४०), संदीप कदम (१४३), सुमित राधाकिसन कदम (१४२), सुखदेव जुंधारे (१४६), राजेंद्र धोक्रट (१२८), अली हुसेन नसीर पटेल (१२२) हे विजयी झाले. त्यांनी जनसेवा पॅनलच्या केतन कदम (९८), चांगदेव कदम (९३), राजाराम कदम (८८), ज्ञानेश्वर चंद्रे (८६), कचेश्वर जुंधारे (९८), दादा नेहे (८३), मीराबाई रामनाथ मोरे (७८), शब्बीर शेख (७७) यांना पराभूत केले.
इतर मागास प्रवर्गातून पीरसाईचे इंद्रजित कदम (१३९) विजयी झाले. त्यांनी राजेंद्र कदम (९६) यांचा पराभव केला. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून कैलास मोकळ (१३७) विजयी झाले. तर बाळासाहेब मोकळ (९९) यांना पराभव पत्करावा लागला. भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून कारभारी जुंधारे (१३४) विजयी झाले. त्यांनी निवृत्ती वाल्मिक कुमावत (१०२) यांना पराभूत केले. निवडणूक निकालानंतर पीरसाईबाबा पॅनलच्या समर्थकांनीजल्लोष साजरा केला. पीरसाई पॅनलचे नेते अंबादास कदम, किरण चंद्रे, शशिकांत कदम यांनी सभासदांचे आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.