आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नाशिक-पुणे महामार्गावर पोलिसांची नाकाबंदी; दुचाकी चोरी व चैन स्नॅचिंगच्या घटना रोखण्यासाठी दुचाकीस्वारांची चौकशी

सिन्नर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुचाकी चोरीचे वाढते प्रमाण आणि चेन स्नॅचिंगच्या घटना यांना पायबंद घालण्यासाठी सिन्नर पोलिसांनी नाशिक-पुणे महामार्गावरील आडवा फाटा भागात शनिवारी तीन तास नाकेबंदी केली.

वाहनचालकांची कसून चौकशी करण्याबरोबरच कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. विशेषतः रेसर बाइक पोलिसांचे लक्ष्य होते. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर, ग्रामीण अधीक्षक सचिन पाटील, अधीक्षिका माधुरी कांगणे, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन चौधरी यांच्या पथकाने ही कार्यवाही केली. रवींद्र चिने, सुशील शिंदे, नितीन गाढवे यांचा यात समावेश होता. चेन स्नॅचिंग करणारे चोरटे बऱ्याचदा धूम स्टाइलने पोबारा करतात. दुचाकीचोरीही वाढल्याने नाकाबंदीमुळे वचक बसावा, कागदपत्रे तपासणीतून चोरीच्या दुचाकी व चोरटे जाळ्यात यावेत या हेतूने अचानक नाकाबंदी करण्यात आली. संशयित वाटणाऱ्या दुचाकीस्वारांना थांबवून तपासणी करण्यात आली. ४० दुचाकीचालकांची चौकशी करण्यात आली. पुढील काही दिवस शहर व परिसरातील वर्दळीच्या मार्गांवर पोलिसांकडून अचानक नाकाबंदी करून दुचाकीस्वारांची चौकशी करण्याची कार्यवाही सुरूच ठेवण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...