आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकमुखी निर्णय:अवजड वाहनांमुळे पुलाची दुरवस्था, दुरुस्तीसाठी ‘समृद्धी’चे रोखणार काम; सोनांबे ग्रामस्थांच्या दीड वर्षापासूनच्या मागणीकडे दुर्लक्ष

सिन्नर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

समृद्धी महामार्ग कामाच्या अवजड वाहनांमुळे सोनांबे गावातील देवनदीवरील पुलाची दुरवस्था झाली आहे. मात्र दीड वर्षापासून मागणी करूनही तो दुरुस्त केला जात नसल्याने संतापलेल्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी ठेकेदार कंपनीला चार दिवसांची मुदत देत काम बंद पाडण्याचा इशारा दिला आहे. दीड वर्षे पाठपुरावा करूनही ठेकेदार कंपनीने कोणतीही दाद दिली नाही. अखेर सरपंच डॉ. रवींद्र पवार यांच्यासह सदस्य व ग्रामस्थांनी कंपनीकडे संताप व्यक्त केला.

चार दिवसांत पुलाच्या निर्मितीसह संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू न केल्यास शनिवारी (दि. १४) समृद्धीचे काम बंद पाडण्यात येणार असल्याचे सरपंच डॉ. पवार यांनी डीएससीपीएल कंपनीचे अधिकारी राजन रघू यांना सांगितले. याबाबत कंपनीचे प्रकल्प अधिकारी वेणुगोपाल यांनाही मोबाइलवरून कळविण्यात आले आहे. माजी सरपंच संजय बोडके, दामोदर बोडके, ग्रामपंचायत सदस्य भगवान पवार, विकास पवार, सुभाष जोरवे, विठ्ठल पवार, संजय पवार, एकनाथ कडभाने, अनिल पवार, अभिषेक वारुंगसे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...