आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निसटता विजय:कीर्तांगळी सोसायटीवर ‘समर्थ शेतकरी ग्रामविकास’ची सत्ता; हरिबाबा ग्रामविकास पॅनलला अवघ्या सहा जागा

सिन्नर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कीर्तांगळी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे समर्थकांची बहुमताने सत्ता आली आहे. १३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत समर्थ शेतकरी ग्रामविकास पॅनलला सात तर विरोधी संत हरिबाबा ग्रामविकास पॅनलला सहा जागा मिळाल्या. यात समर्थ पॅनलला अगोदरच दोन तर संत हरिबाबा पॅनलला एक जागा अविरोध मिळाली होती. उर्वरित १० जागांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी आर बी त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. सचिव बाळासाहेब कोकाटे यांनी सहकार्य केले. रामनाथ चव्हाणके, मुकुंद चव्हाणके, नारायण चव्हाणके, भाऊसाहेब चव्हाणके, ज्ञानेश्वर चव्हाणके यांच्या नेतृत्वाखाली समर्थ पॅनलने तर संपत चव्हाणके, दगू चव्हाणके यांच्या नेतृत्वाखाली संत हरिबाबा पॅनलने निवडणूक लढवली. सर्वसाधारण गटात आठ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत समर्थ पॅनलला तीन जागा मिळाल्या. अशोक बापू चव्हाणके, विठ्ठल अमृता चव्हाणके, मच्छिंद्र रामनाथ चव्हाणके हे विजयी झाले. तर संत हरिबाबाचे दशरथ किसन चव्हाणके, नवनाथ कारभारी चव्हाणके, रंगनाथ खंडेराव चव्हाणके, अशोक छबू चव्हाणके, कैलास रामभाऊ चव्हाणके हे विजयी झाले. भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातून समर्थचे लक्ष्मण यादवदास बैरागी, इतर मागास प्रवर्ग गटातून भागवत सदाशिव चव्हाणके हे विजयी झाले.

अनुसूचित जातीजमाती प्रवर्गातील संजय भीमराव शिरसाठ हे समर्थ पॅनलचे उमेदवार अगोदरच अविरोध निवडले गेले होते. महिला राखीव गटात समर्थच्या मीराबाई लक्ष्मण चव्हाणके तर संत हरिबाबाच्या चंद्रकला चव्हाणके या अविरोध निवडल्या गेल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...