आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृत्रिम पाणीटंचाई:मनेगावसह 22 गावे पाणी योजनेचा वर्षभरात तीन वेळा वीजपुरवठा खंडित; नऊ लाख रुपयांचे थकले ​​​​​​​वीजबिल, अनुदानही मिळेना

सिन्नर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनेगावसह २२ गावे पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल थकल्याने वर्षभरात तीन वेळा पुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणने केली आहे. यामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्या सोळा गावांवर पुन्हा जलसंकट निर्माण झाले आहे. दरम्यान, पाण्याची कुठलीच सुविधा नसल्याने योजनेतील बऱ्याचशा गावांना पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेकडून देण्यात येणारे ५० टक्के अनुदानही मिळाले नसल्याने वीज देयकाची आठ लाख ८० हजार रुपयांची थकीत रक्कम कशी भरावी, असा प्रश्न पाणीपुरवठा समितीसमोर उभा राहिला आहे.

जलवाहिन्यांना होणारी गळती, पाणीपट्टी जमा करण्यासाठी होणारी धावपळ, पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना होणारी तारेवरची कसरत यामुळे योजना चालवताना समितीची दमछाक होऊ लागली आहे. त्यातच महावितरणने वीज देयक न भरल्याने वीजपुरवठा खंडित केल्यामुळे समितीसमोर अडचण निर्माण झाली. कडक उन्हाळ्यामुळे पाण्याची गरज असताना गरजेच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने योजनेतील समाविष्ट गावांतील ग्रामस्थांत संताप व्यक्त केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...