आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथे रमजान ईदनिमित्त नमाज पठण, प्रार्थना, शुभेच्छा आदी कार्यक्रम पार पडले. हिंदू बांधवांकडून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या. तर हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी मुस्लिम बांधवांकडून प्रार्थना करण्यात आली.
मुस्लिम बांधवांनी येथील ईदगाह मैदानावर नमाज पठण केले. मौलाना मोविद रजा यांच्या मार्गदर्शनाखाली पाच मशिदीतील मौलाना व मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. यावेळी हिंदू-मुस्लिम समाज ऐक्याची प्रार्थना करण्यात आली. बब्बू सय्यद, निसार सय्यद, हसनभाई लिंबुवाले, मुजाहिद खतीब, सलीम काजी, मुदीर शेख, तनवीर शेख, हाजी अब्दुल रज्जाक सय्यद, अयुब शेख, इक्बाल सय्यद, सिकंदर हकीम आदी सहभागी झाले होते.
तहसीलदार राहुल कोताडे, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, माजी उपनगराध्यक्ष नामदेवराव लोंढे, माजी नगरसेवक श्रीकांत जाधव, गोविंद लोखंडे, उदय गोळेसर, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विनायक सांगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नामदेव कोतवाल, प्रहारचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे, दत्ता वायचळे, हरिभाऊ तांबे आदींनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.