आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्रमक:महसूल कर्मचारी बेमुदत संपावर, सर्वसामान्यांची कामे खोळंबणार

सिन्नर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तहसील कार्यालयात शुकशुकाट; तहसीलदार, नायब तहसीलदार कामावर

अव्वल कारकूनमधून नायब तहसीलदार पदोन्नतीची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी, शासन निर्णय १ मे २०१९ अन्वये राज्यस्तरीय केलेल्या नायब तहसीलदार संवर्ग रद्द करावा यासह विविध मागण्यांसाठी सोमवार (दि. ४) पासून महसूल कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत.

त्यामुळे सिन्नर तहसील कार्यालयात सोमवारी दिवसभर शुकशुकाट होता. तहसीलदार, निवासी, प्रशासन नायब तहसीलदार, संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार वगळता इतर सर्व कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. कामांसाठी आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना रिकाम्या हाती परतावे लागल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

महसूल कर्मचाऱ्यांचा संपात केवळ तहसीलदार आणि नायब तहसीलदार आणि मंडळ अधिकारी यांचा समावेश नव्हता. तहसीलदार राहुल कोताडे यांनी संप असूनही आपले न्यायालयाचे कामकाज सुरू ठेवले होते. प्रशासन, निवासी आणि संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार कार्यालयात थांबून होते

बातम्या आणखी आहेत...