आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएचएएलकडून नाशिक विमानतळाच्या रनवेचे वार्षिक दुरुस्तीचे काम शनिवारी (दि. ३) पूर्ण हाेणार आहे. यानंतर स्पाइस जेटची हैदराबाद व दिल्ली या दोन शहरांकरिताची विमानसेवा पुन्हा एकदा सुरू हाेणार आहे.१३ दिवसांत प्रवासी व संरक्षण विभागाशी निगडित विमानाला या रन वे वर लँडिंग अथवा टेक टेकऑफ करायला बंदी होती.
एचएएलकडून दरवर्षी रनवेचे वार्षिक देखभाल व दुरुस्तीचे काम केले जाते. यावर्षी देखील पूर्वनियोजित सूचनेनुसार २० नोव्हेंबर ते ३ डिसेंबरपर्यंत हे काम केले गेलेे. यामुळे नियमित सुरू असलेल्या दिल्ली -नाशिक- दिल्ली व हैदराबाद -नाशिक -हैदराबाद या स्पाइस जेटच्या विमानसेवा देखील थांबवण्यात आल्या होत्या. कंपनीने तिकिटांचे बुकिंग कायम ठेवले असल्याने या सेवा नियमित होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दिल्ली - जैसलमेर -नाशिक विमानसेवेचीही शक्यता स्पाइस जेटकडून या पुढील काळामध्ये दिल्ली-जैसलमेर-नाशिक, अशी हॉपिंग फ्लाइट सुरू होण्याची शक्यता आहे. कंपनी याबाबत गांभीर्याने विचार करत आहे. लवकरच ही सेवा नाशिककरांना उपलब्ध होऊ शकते. ज्यामुळे राजस्थानमध्ये पर्यटनाला जाऊ इच्छिणाऱ्या नाशिककरांना त्याचा लाभ होऊ शकणार आहे. राजस्थानमध्ये येणाऱ्या पर्यटकांना वाॅइन कॅपिटल ऑफ इंडिया समजल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये वाॅइन टूरिझमसाठी प्रवास सुलभ होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.