आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंदोत्सव साजरा:भोकणी विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्षपदी शिवाजी सांगळे; समर्थकांकडून आनंदोत्सव साजरा

भोकणी17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील भोकणी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी शिवाजी दगडू सांगळे यांची तर उपाध्यक्षपदी अण्णा साबळे यांची अविरोध निवड झाली.

संस्थेच्या कार्यालयात अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्ष पदासाठी शिवाजी सांगळे व उपाध्यक्षपदासाठी आण्णा साबळे यांचा एकेक अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची अविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी लोखंडे यांनी केली.

निवडीनंतर नवनिर्वाचित संचालक, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. समर्थकांनी गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. निवडणूक अधिकारी म्हणून लोखंडे यांनी काम पाहिले. सचिव माधव जाधव यांनी सहाय्य केले. एक महिन्यापूर्वी १३ जागांसाठी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक लागली होती.

संचालकपदी शिवाजी सांगळे, आण्णा साबळे, कांताराम कुर्हाडे, सुमन कुऱ्हाडे, कैलास डावखर, संपत ओहळ, लंका सानप, निवृत्ती रणशेवरे, लक्ष्मण साबळे, धोंडिबा सांगळे, तात्या सानप, सिताराम दराडे, शंकर दराडे आदींची निवड झाली. निवडणूक अविरोध पार पाडण्यासाठी सरपंच अरुण वाघ, ग्रामपंचायत सदस्य शरद साबळे, राजू सानप, सुनील सानप, दामू सानप, भीमा सानप, शांताराम कुर्हाडे, नारायण आभाळे, राजू वाघ आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...