आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक-पुणे महामार्गावर शिवशाही बस जळून खाक:सलग तिसऱ्या दिवशी एसटीच्या तिसऱ्या बसला आग,43 प्रवाशांचा जीव वाचला

सिन्नर/ संगमनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नरजवळ बुधवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास धावत्या शिवशाही बसला आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखून सर्व ४३ प्रवाशांना सुखरूप उतरवले. एसटीच्या बसेसना आग लागल्याची बुधवारची ही ३१ ऑक्टोबरपासून सलग तिसरी घटना आहे. पिंपरी-चिंचवड आगाराची बस (एमएच ०६, बीडब्ल्यू ०६४०) नाशिक येथून सकाळी ७ च्या सुमारास पुण्याकडे रवाना झाली. माळवाडी शिवारात बस आल्यानंतर गती आपोआप मंदावल्याचे चालक अमीत वासुदेव खेडेकर (४१) यांच्या लक्षात आले. त्यांनी बस रस्त्याच्या डाव्या बाजूला घेतली.

...आणि प्रवासी सुखरूप उतरले खेडेकर यांनी तातडीने वाहक व प्रवाशांना उतरण्यास सांगितले. सर्व प्रवासी उतरेपर्यंत बसची मागील बाजू पूर्ण पेटली होती. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप उतरले.

३१ ऑक्टोबर : अमरावतीजवळ एसटीची एका बसला अचानक आग लागली. मात्र, ३२ प्रवासी सुखरूप बचावले. ०१ नोव्हेंबर : पुण्यात शिवशाही बस अशीच पेटली. या घटनेतही सुदैवाने ४२ प्रवासी बचावले.

बातम्या आणखी आहेत...