आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:अधिकाऱ्यांचा तालुका म्हणून सिन्नरची ओळख निर्माण व्हावी; पाटोळे येथे विकासकामे लोकार्पण सोहळ्यात माजी आमदार वाजे यांचे प्रतिपादन

सिन्नर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर तालुका हा अधिकाऱ्यांचा तालुका म्हणून नावारूपास यावा. अभ्यासिकेच्या माध्यमातून अधिकारी घडावेत, असे प्रतिपादन माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केले. पाटोळे येथे विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

युवानेते उदय सांगळे, आयएएस अधिकारी रवींद्र खताळे यांच्या हस्ते गोपीनाथ मुंढे सामाजिक सभागृह, छत्रपती शिवाजी महाराज जॉगिंग ट्रॅक, अभ्यासिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी दुय्यम निबंधक राजेंद्र आव्हाड, रामनाथ पावसे, माजी सरपंच मेघराज आव्हाड, सरपंच, संगीता आव्हाड, उपसरपंच देवीदास कराड, जिजा खताळे, गीतांजली कराड, मोहिनी खताळे, मनीषा खताळे, मनोहर चकोर, सुनील सांगळे, भाऊपाटील खताळे, माजी सरपंच सोपान खताळे, नंदू खताळे, ग्रामसेवक वाय. डी. पापळ, योगेश बैरागी आदी उपस्थित होते.

स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून नवीन पिढी घडावी. त्यामुळे अभ्यासिकांची संकल्पना पुढे आल्याचे माजी आमदार वाजे यांनी सांगितले. अभ्यासिका ही चळवळ उभी राहिली आहे. सुसज्ज अभ्यासिका गावोगावी होणे आवश्यक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

आठ वर्षांत गावात अनेक विकासकामे झाल्याचे युवानेते उदय सांगळे यांनी सांगितले. रस्ते, गटारी, मंदिर परिसर विकासकामे पूर्णत्वास गेली. विशेषतः पाटोळे ते डुबेरे मार्गाचे झालेले काम महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशासकीय अधिकारी रवींद्र खताळे यांनी गावाच्या विकासासाठी सर्व ती मदत करण्याचे आश्वासन दिले. राजेंद्र आव्हाड, बाळासाहेब कराड यांनी प्रास्ताविक केले.

बातम्या आणखी आहेत...