आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सिन्नरला होणार सुविधांयुक्त बुद्धविहार; निधीसाठी सामाजिक न्यायमंत्री मुंडे यांचे आश्वासन

सिन्नर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर शहरात लवकरच सुविधांयुक्त असे बुद्धविहार साकारले जाणार असून त्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

शहरात अनेक वैशिष्ट्यपूर्ण विकासकामे साकारली आहेत. अनेक कामे मंजूर असून त्यांचा लवकरच शुभारंभ होणार आहे. शहरात सुविधांयुक्त व सर्व समाजाला उपयुक्त पडेल, असे बुद्धविहार बांधण्याचा निर्णय घेतला असून आमदार माणिकराव कोकाटे यांनी नुकतीच राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन सिन्नर शहरातील बुद्धविहारास मंजुरी देण्याची मागणी केली.

यावेळी सिन्नर शहर व तालुक्यातील नागरिकांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून अधिक चांगल्या सुविधा देण्याची मागणीही करण्यात आली. बुद्धविहार बांधकामाचा प्रस्ताव तात्काळ दाखल करण्याचा आदेश मंत्री मुंडे यांनी दिला. त्यासाठी निधीचे बंधन नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जेवढा निधी लागेल तेवढा आपण देण्यास कटिबद्ध राहू, असा शब्दही मुंडे यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...