आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परवानगी:सिन्नरला दुपारी पाळली डेसिबलची मर्यादा; 25 मशिदींनी घेतली ध्वनिक्षेपक वापराची परवानगी

सिन्नर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यातील २५ मशिदींमध्ये सकाळची अजान भोंग्याविना पार पडली. याशिवाय दिवसभरात घेण्यात येणाऱ्या इतर चार अजानही आवाजाची मर्यादा पाळत घेण्यात आल्या. दरम्यान, तालुक्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नसला तरी सिन्नर पोलिसांनी मनसेच्या तालुकाप्रमुखासह सहा जणांना स्थानबद्ध केले होते.

मनसे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ९ मशिदींबाहेर प्रत्येकी दोन याप्रमाणे पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. याशिवाय तीन अधिकारी, ३५ कर्मचारी, १५ होमगार्ड असा लवाजमा बंदोबस्तात गुंतला होता. शहरातील काजीपुरा भागातील बारभाई, शक्कर, मक्का, शिंपी गल्लीतील जामा, नवापूल येथील मदिना, डुबेरे येथील जामा, सोनांबे येथील मदिना आणि ठाणगाव येथील मदिना अशा ९ मशिदींस्थळी पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

वावी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शहा, कोळगावमाळ, वावी, पांगरी, नांदूरशिंगोटे, दापूर, चास आदी ठिकाणच्या मशिद परिसरात पोलिस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वावी पोलिस ठाणे हद्दीतील सर्व नऊ मशिदींच्या मौलानांनी ध्वनिक्षेपक वापराची परवानगी घेतली आहे.

याशिवाय ध्वनिक्षेपक वापरणाऱ्या ११ मंदिरांपैकी सात मंदिरांच्या विश्वस्तांनीही परवानगी घेतली आहे. मुसळगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुसळगाव, बारागाव पिंप्री, नायगाव, वडांगळी, दातली, देवपूर या सहाही ठिकाणी पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तालुक्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

बातम्या आणखी आहेत...