आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाध्यमिक लोकशिक्षण मंडळाच्या नानासाहेब गडाख शैक्षणिक संकुलात आधुनिक तंत्रज्ञान युक्त शिक्षणाचा दृष्टिकोन राबवला जात असून विद्यार्थी सर्वगुण संपन्न घडवण्याचे प्रयत्न सातत्याने राहिल्याचे प्रतिपादन संस्थेचे सचिव राजेश गडाख यांनी केले. एस. जी प्राथमिक विभागात पारितोषिक वितरण व चौथीच्या विद्यार्थ्यांना आशीर्वाद कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर स्काऊट गाईड जिल्हा समुपदेशक विश्वनाथ शिरोळे, मुख्याध्यापक उदय कुदळे, सोमनाथ थेटे आदी उपस्थित होते. विविध स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. चौथीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.
मुख्याध्यापक उदय कुदळे यांनी प्रास्ताविकात वर्षभर राबविण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचा, स्पर्धांची माहिती दिली. अथर्व गडाख, समर्थ डावरे, कल्याणी रानडे, दर्शन चौधरी, शर्वरी गोळेसर, सेजल सहाणे, तेजल चौधरी या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. उपशिक्षक पांडुरंग लोहकरे यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी शाळेसाठी दोन डस्टबिन भेट म्हणून दिल्या. शाळेच्या वतीने २१६ विद्यार्थ्यांना शाळेचा लोगो असलेला पॅड भेट दिला. विविध क्षेत्रात नैपुण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक, बक्षीस देऊन गौरविण्यात आले. पद्मा गडाख, जयश्री सोनजे यांनी सूत्रसंचालन केले. गणेश सुके यांनी आभार मानले.
मुख्याध्यापक उदय कुदळे, सोमनाथ थेटे, भास्कर गुरुळे, बापू चतुर, पांडुरंग लोहकरे, सागर भालेराव, जिजाबाई ताडगे, जयश्री सोनजे, वृषाली जाधव, सतीश बनसोडे, अमोल पवार, मंदा नागरे, कविता शिंदे, गणेश सुके, सुधाकर कोकाटे, पदमा गडाख , योगेश चव्हाणके, नीलेश मुळे, शिवाजी कांदळकर आदींनी कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.