आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुणपत्रक घेऊन घरी परतताना चालत्या रिक्षातून दोन विद्यार्थिनींनी उडी घेतली. यात एकीच्या डोक्याला मार लागल्याने जागीच ठार झाली, तर दुसरी जखमी झाली. उतरण्याचे ठिकाण येऊनही रिक्षा न थांबवल्याने त्यांनी उड्या घेतल्याचे सांगितले जाते. रविवारी सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली.
डुबेरे येथील जनता विद्यालयातील गायत्री अशोक चकणे (१४, रा. वडगाव पिंगळा, ह. मु. आटकवडे) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती दहावीत शिकत हाेती. सायली भगवान आव्हाड (११, रा. आटकवडे) ही जखमी झाली. गायत्रीच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाल्याने ती मामांकडे आटकवडे येथे राहत होती.
दोघीही गुणपत्रिका घेऊन घरी परतत होत्या. त्यांनी डुबेरे येथून आटकवडेला कोंबड्या घेऊन जाणाऱ्या अॅपेरिक्षाला हात देऊन पाठीमागे बसल्या. चालक समीर अहमद शेख (रा. डुबेरे) याच्या आटकवडे येथे रिक्षा थांबवण्याचे लक्षात आले नाही. गायत्री व सायली यांनी आवाज देऊनही त्यास ऐकू गेले नाही. रिक्षा थांबत नसल्याने दोघींनी चालत्या रिक्षातून उडी घेतली. गायत्रीच्या डोक्याला मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. सायलीच्या डोक्याला व हाताला मार लागल्याने जखमी झाली. इतर वाहनचालकांनी पुढे जाऊन रिक्षाचालकास थांबवून घडलेला प्रकार सांगितला. स्थानिकांनी रुग्णवाहिका बोलावून खासगी रुग्णालयात दाखल केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.