आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुलासा:मंदिरात भविष्य पाहिले जात नाही; समितीचा खुलासा

सिन्नर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थान न्यासाचे सिध्द क्षेत्र श्री ईशान्येश्वर मंदिर हे निसर्गरम्य ठिकाणी आधुनिक पध्दतीने हेमाडपंती स्वरूपात बांधण्यात आले आहे. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या मंदिरात बुधवारी इतर भक्तांप्रमाणेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या पत्नी, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दर्शन घेतले. मंदिरात कुठल्याही प्रकारे हात, कुंडली किंवा ज्योतिष बघण्याचा प्रकार होत नसल्याचा दावा संस्थानचे सरचिटणीस नामकर्ण आवारे यांनी केला आहे.

विविध माध्यमातून आलेल्या बातम्यांमुळे संस्थांचे अध्यक्ष कॅप्टन अशोक कुमार खरात यांच्यासह आमच्या संस्थानची नाहक बदनामी झाल्याचे त्यांनी आपल्या खुलाशात नमूद केले आहे.

मंदिर सर्वांसाठी खुले शिवनिका संस्थानचे मंदिर हे सर्वसामान्य जनतेसाठी उभारण्यात आले आहे. तेथे छोटा-मोठा, गरीब, श्रीमंत कुणीही दर्शनासाठी येऊ शकतात, त्याच न्यायाने मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी दर्शन घेतल्याचे आवारे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या दर्शनाबाबत माध्यमांवर उलटसुलट चर्चा सुरू झाल्याने संस्थानकडून हा खुलासा करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...