आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ऐन सुटीच्या दिवसांत शिक्षकांचीच भरली शाळा; एस. एम. जोशी अध्यापक विद्यालयातील मित्र-मैत्रिणींचे २१ वर्षांनी स्नेहमीलन

सुरगाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एस. एम. जोशी अध्यापक विद्यालय, नाशिकरोड येथे सन- १९९९-२००१ या कालावधीत शिकणाऱ्या अध्यापक विद्यार्थी- विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा नुकताच पार पडला.

अध्यक्षस्थानी प्राचार्य अरुण देशमुख हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून भालेराव, कड, शिरसाठ, कुलकर्णी, डावखर, आवटे आदी शिक्षक उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांनी अध्यापक विद्यालयास दहा हजार रुपयांची देणगी दिली. कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात कोरोना कालावधीत स्वर्गवासी झालेला या बॅचचा विद्यार्थी गणेश तोडकर (लातूर) यास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शिक्षकांच्या वतीने कड व भालेराव मॅडम यांनी मार्गदर्शन केले.

विद्यार्थीवर्गाकडून रेखा काळे व जितेंद्र मानकर यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य देशमुख यांनी सर्व विद्यार्थी हे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात शिक्षक म्हणून चांगल्याप्रकारे आपली सेवा बजावत आहेत. याबद्दल समाधान व्यक्त केले. २१ वर्षांनंतर सर्व विद्यार्थ्यांच्या गाठीभेटी झाल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.

सूत्रसंचालन शीतल पिंगटे आणि उमेश पवार यांनी केले. कार्यक्रमास बुलडाणा, अहमदनगर, पुणे, ठाणे, मुंबई, जळगाव, औरंगाबाद, जालना, सातारा, इंदूर आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. दुसऱ्या सत्रात प्रीती भोजनाचा व गप्पागोष्टींचा कार्यक्रम हॉटेल ग्रेपसिटी येथे आयोजित करण्यात आला होता.

यावेळी शीतल पिंगटे, रेखा काळे, रूपाली जैन, मनीषा बैरागी, चंदा काकड, अनिता खर्चे, वेणूताई बांगर, रजनी भांगरे, मंजूश्री वाळके, वैशाली उंडे, मीनाक्षी वर्पे, नंदिनी गावले, सारिका चव्हाण, विनायक पानसरे, बबन चव्हाण, राजेंद्र धांडे, दिलीप अहिरे, बाबासाहेब जाधव, पंकज कापसे, नारायण साबळे, नामदेव वाजे, बाबासाहेब चेके, जितेंद्र मानकर, संदीप बाबूराव सोनवणे, नीलेश महाजन, अरविंद पाटील, संदीप अरुण सोनवणे, दिनेश बिरारी, उमेश पवार, चंद्रकांत भांगरे आदी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...