आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:ट्रक उलटल्याने तीन ऊसतोडणी मजूर गंभीर; अपघातात 20 जण किरकोळ जखमी

नांदगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदगाव-चाळीसगाव रस्त्यावर बाभूळवाडी शिवारात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ऊसतोडणी करणाऱ्या कामगारांचा ट्रक उलटल्याने घडलेल्या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले तर वीस जणांना किरकोळ दुखापती झाल्या. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याने नांदगाव पोलिसांत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भीमाशंकर कारखान्यासाठी ऊस-तोडणी करण्यासाठी गेलेले मजूर ट्रकने आपल्या मूळगावी बोढरे तांडा (ता. चाळीसगाव) येथे परतत असताना रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्यालगतच्या छोट्या नाल्यात उलटला. अपघातात जखमी झालेल्यांना पोलिस वाहन, रुग्णवाहिका आणि मिळेल त्या खासगी वाहनाने नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

जखमी झालेल्यांपैकी तीन जणांच्या छातीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मालेगाव आणि चाळीसगाव येथे पाठविण्यात आले. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी शमायना मोमीन व त्यांच्या पथकाने जखमींवर उपचार केले.

बातम्या आणखी आहेत...