आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैलगाडा शर्यत:13 वर्षानंतर लिंगटांगवाडी शिवारात बैलगाडा शर्यतींचा थरार

सिन्नर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उच्च न्यायालयाने बंदी उठवल्यानंतर तब्बल १३ वर्षांनंतर होळीला सिन्नरजवळील लिंगटांगवाडी शिवारात गुरुवारी (दि. १७) बैलगाडी शर्यतींचा थरार अनुभवयास मिळाला. या शर्यतीत एकही घोडा धावला नाही. केवळ बैलांनाच परवानगी होती.अंतिम शर्यतीत विजेत्या बैलगाडामालकास पाच हजार रुपयांचे रोख पारितोषिक, ढाल आणि तांब्याचा हंडा भेट देण्यात आला. स्पर्धेसाठी जनावर सुदृढ असल्याचे प्रमाणपत्र डॉक्टरांनी दिल्यानंतर बैलाला धावपट्टीवर उतरवले जात होते. राज्यभरातून तांगाशौकिन उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...