आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ना मिळाले गाढव, ना मिळाला जावई !:वडांगळीतील जावयाची गाढवावरून धिंड काढण्याची परंपरा यंदा खंडित

सिन्नर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडांगळी येथील ब्रिटीश काळापासून चालत आलेली जावयाची गाढवावरून धिंड काढण्याची परंपरा या वेळी खंडीत झाली. गाढव आणि जावई शोधण्यात तरुणांनी दाखवलेली दिरंगाई, खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत गुंतलेले कार्यकर्ते, यामुळे ही प्रथा मोडीत निघाली.

सुमारे शे- सव्वाशे वर्षांपासून वडांगळी ग्रामस्थ जावयाची गाढवावर बसवून सवाद्य ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढून नंतर त्याचा यथोचित सत्कार करून बोळवण करतात. कोरोनाच्या काळात ही धिंड निघाली नाही. त्या अगोदर एक दोन वेळा काही अपरिहार्य कारणास्तव धिंड निघाली नाही. असे दोन तीन अपवाद वगळता आजतागायत अखंडपणे जावयाची धिंड काढण्यात वडांगळीकर यशस्वी ठरले. ज्या धिंडीचे महाराष्ट्रात नामांकित वृतवाहिन्या, वृत्तपत्रे, समाज माध्यमे आवर्जून दखल घेतात अशी प्रथा अचानक खंडित झाली. होळी ते रंगपंचमी या काळात कोणत्याही परिस्थितीत गाढव शोधून आणत येन केन प्रकारे जावई शोधून त्यांची धिंड काढली जातेच.

निवडणुकीमुळे तरुण व्यग्र
यावेळेस तरुणांची उदासीनता, ग्रामस्थांच्या सहभागाचा अभाव आणि महत्वाचे कारण आज पंचमीच्या दिवशीच खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीचे मतदान असल्याने वडांगळीमधील सरपंच, आजी माजी आमदारांचे समर्थक, कार्यकर्ते सर्वच सिन्नरला निवडणुकीत होते. त्यामुळे गावात गाढव व जावई शोधण्यासाठी कोणतीच यंत्रणा कामाला लागली नाही. सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे धिंडीसाठी खर्च कोणी करायचा याचीही चर्चा गावात होती.

बातम्या आणखी आहेत...