आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबांधकाम पूर्ण होऊन उद्घाटन झालेले नसतानाही दोन वर्षांपूर्वी केवळ कोरोना महामारीमुळे आपत्कालीन स्थितीत कुठलीही साधनसामग्री नसताना सुरू कराव्या लागलेल्या सिन्नरमधील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात १५ दिवसांपासून एकही कोरोनाबाधित रुग्ण उपचाराधीन नाही. त्यामुळे हे रुग्णालय आता ‘नॉन कोविड’ म्हणजेच सर्वसामान्य रुग्णांसाठी खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
१ एप्रिलपासून प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. शासनाच्या लेखी ३० बेडची क्षमता असलेल्या या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात प्रत्यक्षात तळमजला आणि पहिल्या माळ्यावर तब्बल २०० रुग्णांची व्यवस्था करता येईल इतके बेड सज्ज आहेत. याशिवाय व्हेंटिलेटर आणि दोन कृत्रिम ऑक्सिजन प्लांट, बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, डिलिव्हरी रूम, ऑपरेशन थिएटर, औषध विभाग, रक्त-लघवी तपासणी प्रयोगशाळा, आदी यंत्रणा रुग्णांच्या उपचारासाठी सज्ज आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.