आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिन्नर:फुलेनगरला पडीक विहिरीत पडून बिबट्याच्या दोन बछड्यांचा मृत्यू

सिन्नर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील फुलेनगर येथे बिबट्याच्या दोन बछड्यांचा पडीक विहिरीत पडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास उघडकीस आली. खेळता खेळता किंवा आपल्या मातेच्या मागे फिरताना कठडे नसलेल्या या विहिरीत हे बछडे पडले असावेत, असा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. फुलेनगरच्या विष्णू त्र्यंबक भगत यांची निऱ्हाळे रोड येथील शेतात पडीक विहीर आहे. त्यात तीन ते चार महिने वयाचे बिबट्याचे दोन बछडे मृतावस्थेत आढळून आले. नर आणि मादी असलेले हे दोन्ही बछडे पाण्यात फुगून वर आले होते. विहिरीच्या कडेने शेतात जात असताना पोपट भगत यांच्या ही बाब निदर्शनास आली.

बातम्या आणखी आहेत...