आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडुबेरे येथे अनेक दिवसांपासून पाणीटंचाई असल्याने नागरिकांना दिलासा देण्यासाठी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेने एका टँकरव्दारे दोन फेऱ्या तर सरपंच ज्ञानेश्वर ढोली यांनी स्वखर्चातून एका टँकरव्दारे दोन फेऱ्यांव्दारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. युवानेते उदय सांगळे यांच्या हस्ते पाणी वितरणास सुरुवात करण्यात आली.
पेशवे पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नारायण वाजे, उपाध्यक्ष अरुण वारुंगसे, सरपंच ज्ञानेश्वर ढोली, उपसरपंच नंदा पवार, संस्थेचे संचालक शंकर वामने, आनंदा सहाणे, म्हसू पवार, काशीनाथ वाजे, कारभारी वारुंगसे, माजी सरपंच शरद माळी, विकास सोसायटीचे अध्यक्ष अशोक गवळी, वाळीबा वाजे, विशाल ढोली, इम्तियाज शेख, आयुब शेख, कुटे, मनोज वाजे, किरण ढोली आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
गावासह वाड्या-वस्त्यांवर दररोज टँकरच्या चार फेऱ्या करण्यात येणार आहेत. तर सार्वजनिक नळ पाणीपुरवठा विहिरीतही पाणी टाकले जाणार आहे. त्यामुळे पाणीटंचाईची धग कमी करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत व पेशवे संस्थेने हाती घेतला आहे. शासकीय टँकर सुरू होईपर्यंत ही सेवा दिली जाणार आहे.
सद्यस्थितीत सार्वजनिक नळ पाणीपुरवठ्याद्वारे आठ दिवसांतून एकदाच केवळ तीस मिनिटे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे खासगी टँकरद्वारे ग्रामस्थांना पाणी विकत घ्यावे लागते. परिसरातील विहिरींनी तळ गाठल्याने टंचाईची तीव्रता वाढली आहे. टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने यापूर्वीच दिला आहे.
टंचाईच्या काळात ग्रामस्थांना पाणीपुरवठा करून दिलासा देण्याचे काम महत्त्वाचे असल्याचे मत युवानेते उदय सांगळे यांनी व्यक्त केले. सामाजिक दायित्व म्हणून सुरू केलेल्या कार्यामागे सगळेच उभे राहतात, असे ते म्हणाले. अरुण वारुंगसे यांनी ग्रामपंचायतीने दिलेला प्रस्ताव संस्थेने तत्काळ मान्य करून रोज दोन टँकर पाणी करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.