आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तालुकास्तरीय बैठक:स्वस्त धान्य दुकानदारांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार; राज्य अध्यक्ष गणपत डोळसे पाटील यांची ग्वाही

सिन्नर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इ-पॉस मशिनमध्ये असलेल्या त्रुटींमुळे ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानदारांना काम करताना अनंत अडचणी येत आहेत. त्याचबरोबर इतरही समस्यांना स्वस्त धान्य दुकानदारांना सामोरे जावे लागत आहे. या समस्या निकाली काढण्यासाठी शासनदरबारी आवाज उठवला जाईल, अशी ग्वाही स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गणपतराव डोळसे पाटील यांनी दिली.

सिन्नर तालुका रास्त भाव दुकानदारांची बैठक नाशिक जिल्हाध्यक्ष निवृत्ती महाराज कापसे यांच्यासह तालुका पदाधिकारी आणि रास्त भाव दुकानदारांच्या उपस्थितीत वारकरी भवन सिन्नर येथे झाली. यावेळी मार्गदर्शन करताना डोळसे बोलत होते. प्रारंभी कोरोनाकाळात मयत पावलेल्या दुकानदार व कार्डधारकांना संघटनेतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दुकानदारांच्या विविध विषयांवर साधक-बाधक चर्चा पार पडली.

यावेळी डोळसे व कापसे महाराज यांचा तालुका संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. तालुक्यातील ज्येष्ठ दुकानदारांनाही यावेळी गौरविण्यात आले. जिल्हाध्यक्ष कापसे महाराज यांनी स्वस्त धान्य दुकानदारांना संबोधित करताना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. सिन्नर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष सतीश भुतडा यांनी तालुकास्तरावर काम करताना दुकानदारांना येणाऱ्या अडचणींचा पाढा वाचला. जिल्हा आणि राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानदारांना दिलासा देण्याची मागणी केली.

यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख दिलीप नवले, जिल्हा सचिव गोपाल मोरे, शहराध्यक्ष भगवान जाधव, उपाध्यक्ष दीपक जगताप, जगन्नाथ केदार, विवेक थोरात, नवनाथ गडाख, संजय झगडे, चंद्रकांत माळी, संजय भोत, सुधाकर मुरकुटे, राजेंद्र गोळेसर, बेबीताई खताळ, कल्पना रेवगडे, सुमन बर्डे, जयंत घुमरे, सदाशिव हगावणे, वसंत पवार, गोरख काळे आदींसह रास्तभाव दुकानदार उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...