आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:लातूरात 10 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार; गावातीलच 3 अल्पवयीन मुलांनी केले कृत्य, पोलिसांनी घेतले ताब्यात

लोहारा2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका १० वर्षीय मुलीवर गावातीलच तीन अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना लोहारा तालुक्यातील सास्तूर येथे घडली आहे. याप्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंगळवारी (दि. २०) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सास्तूर येथील एका १० वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना सोमवारी ( दि. १९) निदर्शनास आली. चिमुकलीवर रविवारी (दि. १८) गावातील तीन अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केले. सोमवारी सदरील मुलीला त्रास होत असल्याने दवाखान्यात नेले होते. त्यावेळी सदरील मुलीची प्रकृती पाहून मुलीला लातूर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले व लोहारा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मंगळवारी (दि. २०) पीडित मुलीच्या वडिलांनी लातूर येथे महिला पोलिस अधिकाऱ्याला दिलेल्या जवाबावरून लोहारा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा या प्रकरणातील आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक आर. एम. जगताप हे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...