आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांचे निर्देश:कोरोनामुक्त गावांमध्ये दहावी, बारावीचे वर्ग सुरू होणार;शक्यता तपासून पाहा-शिक्षण विभागास मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक झाली

जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील अशा गावातील इयत्ता दहावी-बारावीचे वर्ग सुरू करता येतील का याची शक्यता विभागाने तपासून पाहावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शालेय शिक्षण विभागास दिले.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक झाली. या वेळी बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुण मूल्यांकन करताना सीबीएसईने जाहीर केलेल्या बारावीच्या मूल्यांकनाच्या धर्तीवर तसेच राज्याने इयत्ता १० वीसाठी मूल्यांकनाची जी पद्धत निश्चित केली त्याचा तुलनात्मक अभ्यास करून १२ वीच्या विद्यार्थ्यांचे गुण मूल्यांकन करण्याबाबतचा अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत अशा विद्यार्थ्यांच्या पहिली ते बारावीपर्यंतचा शैक्षणिक खर्च शासनामार्फत उचलण्याबाबतची योजना शालेय शिक्षण विभागामार्फत तयार करण्यात येत असून यासाठी प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत, अशी माहिती शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...