आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धोक्याची घंटा:एकाच शाळेतील 11 शिक्षक पाॅझिटिव्ह,  शाळा सुरू हाेण्याअाधीच कोरोनाचे ग्रहण, 25 गुरुजी तपासणीला गैरहजर

नांदेड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उस्मानाबाद जिल्ह्यात ४८ शिक्षक पॉझिटिव्ह

राज्य सरकार शाळा सुरू करण्याच्या तयारीत असतानाच नांदेड शहरातील एका उर्दू शाळेतील ११ शिक्षक कोरोना पाॅझिटिव्ह आले. त्यामुळे शाळा सुरू करणे धोक्याचे ठरू शकते का, असा प्रश्न उपस्थित हाेऊ लागला अाहे. दरम्यान, २३ नाेव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या ८५८ शाळा सुरू करण्यात येणार आहेत.

राज्यातील शाळा मार्चपासून बंद आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. परंतु त्याला फार मोठे यश मिळाले नाही. अनेक विद्यार्थ्यांजवळ मोबाइल नसणे, इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसणे यामुळे आॅनलाइन शिक्षण अडचणीचे ठरू लागले. त्यामुळे माध्यमिक वर्गाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्या दृष्टीने जय्यत तयारी सुरू आहे. शाळा सुरू करण्यासाठी सर्व शिक्षकांची माेफत कोरोना तपासणी करण्यात येत अाहेत. त्यात येथील देगलूर नाका परिसरात असलेल्या मदिना तुलूम उर्दू शाळेतील तब्बल ११ शिक्षकांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह अाले. त्यामुळे शाळा पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह लागले आहे. या शाळेतील १०० शिक्षकांना तपासणीसाठी बोलावण्यात आले होते. पैकी ७५ शिक्षकच हजर राहिले. त्यातील ११ शिक्षक पॉझिटिव्ह आले आहेत. २३ रोजी जिल्ह्यात ८५८ शाळा सुरू होणार आहेत.

दिवाळीची गर्दी भोवली : दसऱ्यानंतर जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण कमी होत गेले. परंतु त्यानंतर दिवाळीसाठी बाजारपेठेत गर्दी जमू लागली. दिवाळीपूर्वी चार-पाच दिवस अगोदर बाजारपेठेत तुडूंब गर्दी होती. सर्व रस्ते गर्दीने ओसंडून वाहत होते. त्याचवेळी नेमके कोरोना रुग्णांचे प्रमाणही कमी कमी होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे कोरोना संपला अशीच लोकांची धारणा झाल्याने गर्दीवर कोणाचेच नियंत्रण राहिले नाही. परंतु शुक्रवारी कोरोना रुग्णांच्या संख्येने एकदम उचल खाल्ल्याचे दिसून आले. जिल्ह्यात पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या ७६ आढळली. गेल्या १५ दिवसांतील ही सर्वोच्च संख्या आहे. त्यामुळे दिवाळीत बाजारपेठेत झालेली गर्दी भाेवणार, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

शिक्षण समितीची अाॅनलाइन सभा : सोमवार २३ नाेव्हेंबर रोजी जिल्ह्यातील नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या ८५८ शाळा सुरू करण्यात येणार आहेत. या संदर्भाने शिक्षकांची कोविड तपासणी करण्यात आली. हात धुणे, मास्क लावणे, शाळेचे निर्जंतुकीकरण आदी सर्व उपाययोजना करून आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी केले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची ऑनलाइन सभा शुक्रवारी दुपारी बेळगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेत समितीचे ज्येष्ठ सदस्य व्यंकटराव पाटील गोजेगावकर, लक्ष्मण ठक्करवाड ,साहेबराव धनगे, संध्याताई धोंडगे ,अनुराधा पाटील यांनी सहभाग घेतला.

उस्मानाबाद जिल्ह्यात ४८ शिक्षक पॉझिटिव्ह
उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत ३७८६ शिक्षकांची तपासणी करण्यात आली, त्यात ४८ शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर अद्याप काही अहवाल येणे बाकी असल्याने यामध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या शिक्षकांना उपचार घेण्यासाठी दवाखान्यात किंवा सोय असल्यास घरीच उपचार घेता येतील.

कार्यपद्धतीचे नियाेजन सादर
प्राथमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर व माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.आर. कुंडगीर यांनी शाळा सुरू होण्याआधी व सुरू झाल्यानंतर अवलंबण्याची कार्यपद्धती याबाबत करावयाचे संपूर्ण नियोजन सभागृहास सादर केले. शाळा सुरू हाेण्यापूर्वी हात धुण्यासाठी पाणी व साबण याची व्यवस्था, शाळेची स्वच्छता, निर्जंतुकीकरण करून घ्यावे, सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी २१ नाेव्हेंबरला शाळा भेटी करून पाहणी करावी व अहवाल सादर करावा. शाळा सुरू झाल्यानंतर शाळा व्यवस्थित सुरू होतील या दृष्टीने प्रयत्न करण्याची सूचना सभापतींनी केली.

बातम्या आणखी आहेत...