आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संग्रामपुर:मोबाईल वरुन भावासोबतच्या वादात १२ वर्षीय मुलाची आत्महत्या

संग्रामपुर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टाकळी पंच ता. संग्रामपुर येथील घटना

मोबाईल खेळण्यावरुन दोन भावाच्या झालेल्या वादात बारा वर्षाच्या भावाने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना आज संग्रामपुर तालुक्यातील टाकळी पंच येथे घडली. मृतकाचे नाव शैलेश परमेश्वर इंगळे असे आहे.

टाकळी पंच येथे रविवार, 28 मार्च रोजी दुपारी २ ते २.३० दरम्यान मोबाईल वरुन दोघे भावात किरकोळ वाद झाला.यात शैलेश या १२ वर्षीय भावाने रागाच्या भरात विष प्राशन केले. त्याला उपचारासाठी पातुर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र पुरेशा सुविधा नसल्याने पुढील उपचारासाठी सामाजिक कार्यकर्ते शिवचरण खोंड यांनी विनाविलंब स्वताच्या वाहनाने त्याला शेगाव येथील सईबाई रुग्णालयात हलविले. गंभीर अवस्थेत शैलेशला सर्वोपचार रूग्णालय अकोला येथे नेत असतांनाच शैलेशची प्राणज्योत मावळली. डॉक्टरांनी शैलेशला मृत घोषीत केले. मोबाईल मुळे रागाच्या भरात १२ वर्षीय शैलेजने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याने समाज मनसुन्न झाले असुन टाकळी पंच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...