आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

12 वी निकाल:अखेर बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर, आज दुपारी 1 वाजता पाहता येईल निकाल

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील अनेक दिवस प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल आज मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर दुपारी 1 वाजता पाहता येणार आहे. बारावीच्या सर्वच शाखांची परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च यादरम्यान पार पडली. लॉकडाऊनच्या आधी बारावीची परीक्षा संपली होती. 

उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आज 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात परीक्षा पार पडली होती. यावर्षी बारावीच्या परिक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. एकूण 9923 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती आणि पूर्ण राज्यातील जवळपास 3036 परिक्षा केंद्रांवरुन ही बारावीची परिक्षा घेण्यात आली. यामध्ये सगळ्यात जास्त 5 लाख 85 हजार 736 विद्यार्थी विज्ञान शाखेचे होते, कला शाखेचे 4 लाख 75 हजार 134, तर वाणिज्य शाखेचे 3 लाख 86 हजार 784 विद्यार्थी होते. आता या परीक्षेचा उद्या निकाल लागणार आहे त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा संपली आहे.

खालील वेबसाईटसवर पाहता येईल बारावीचा निकाल

  • www.mahresult.nic.in  
  • www.hscresult.mkcl.org  
  • www.maharashtraeduction.com