आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:इसापूर धरणाचे 13 दरवाजे उघडले, 22207 क्युसेक पाण्याचा पैनगंगा नदीपात्रात विसर्ग, पाणलोट क्षेत्रात सात ठिकाणी अतिवृष्टी

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील सात ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने धरणाचे १३ दरवाजे रविवारी ता. १७ सकाळी अर्धा मिटरने उघडण्यात आले असून त्यातून २२२०७ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सध्या धरणात पाण्याची आवक सुरुच असून कुठल्याही क्षणी पाण्याची विसर्ग वाढविण्याची शक्यता उर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालयाच्या सुत्रांनी व्यक्त केली आहे.

यवतमाळ, हिंगोली व नांदेड जिल्ह्यासाठी महत्वाचे असलेल्या इसापूर धरणात यावर्षी मुबलक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात आता पर्यंत आठ ते दहा वेळे धरणाचे दरवाजे उघडण्याची वेळ आली आहे. धरणातील पाणीसाठ्यामुळे रब्बी हंगामासोबत उन्हाळी पिकांना सिंचनासाठी फायदा होणार असून या तीन जिल्हयात मिळून १.१० लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

दरम्यान, परतीच्या पावसानेही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगलीच हजेरी लावली आहे. पाणलोट क्षेत्रात आज सकाळ पर्यंत पेनटाकळी येथे ५३ मिलीमिटर, साखरखेर्डा ७९ मिलमिटर, मेहकर ९५ मिलीमिटर, डोणगाव १०० मिलीमिटर, रिसोड ४५ मिलीमिटर, गोवर्धन ७२ मिलीमिटर, शिरपूर ७१ मिलीमिटर, गोरेगाव ५५ मिलीमिटर, अनसिंग २२ मिलीमिटर, सिरसम ५६ मिलीमिटर, खंडाळा ५१ मिलीमिटर, तर इसापूर भागात ८४ मिलीमिटर पाऊस झाला आहे. या शिवाय जयपूर बॅरेजेसमधून पाणी सोडण्यात आले आहे.

त्यामुळे इसापूर धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरु झाली असून आज सकाळ पासून धरणाचे १३ दरवाजे उघडून त्यातून २२२०७ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे किंवा कमी करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

या सोबतच हिंगोली जिल्हयातील सिध्देश्वर धरणाचे १२ दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून १००९६ क्युसेक पाण्याचा पूर्णा नदीच्या पात्रात विसर्ग केला जात आहे. त्यामुळे पूर्णा नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आले आहे

बातम्या आणखी आहेत...