आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान:पर्यटनाला राज्य, जिल्ह्याबाहेर गेल्यास 15 दिवस क्वाॅरंटाइन; अजित पवार यांचा इशारा

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुण्यात वीकेंडला केवळ अत्यावश्यक सेवा सुरू

सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, बीड, उस्मानाबाद, काेल्हापूर या काही जिल्ह्यांत अद्याप काेराेनाचे संकट अाहे. वीकेंडला पर्यटनस्थळी माेठ्या प्रमाणात गर्दी हाेते. मात्र, नागरिकांनी काेराेनाचे संकट गांभीर्याने घेणे गरजेचे अाहे. महाराष्ट्राबाहेर व जिल्ह्याबाहेरही माेठ्या प्रमाणात नागरिक फिरण्यास व ट्रेकिंगला जात अाहेत. जर रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली तर त्यांना राज्यात, जिल्ह्यात परत अाल्यानंतर १५ दिवस क्वाॅरंटाइन राहावे लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला अाहे.

पवार म्हणाले, अमेरिका, इंग्लंड व दक्षिण अाफ्रिका येथे काेराेनाच्या तिसऱ्या लाटेचा टास्क फोर्सने इशारा दिला आहे. त्या ठिकाणी लसीकरण वेगाने हाेऊनही भीषण परिस्थितीचा सामना करावा लागता आहे. त्यामुळे नागरिकांनी काेराेनाचे संकट गांभीर्याने घेतले पाहिजे. पिंपरी-चिंचवड शहरात काेराेनाच्या दुसऱ्या लाटेतील मृत्यूंचे विश्लेषण केले असता, चार नामांकित रुग्णालयांत ५३ टक्के मृत्यू ३० ते ६० वर्षांदरम्यान झाले. ४३ टक्के मृत्यू हे काेणतेही अाजार नसताना झालेले अाहेत. पाॅझिटिव्हिटी दर पुणे शहरात पाच टक्के, पिंपरी-चिंचवडमध्ये ५.२ टक्के तर ग्रामीण भागात नऊ टक्के अाहे. अनावश्यक प्रवास, सहली, पर्यटन नागरिकांनी टाळावे. अन्यथा कडक कारवाईला सामाेरे जावे लागेल. स्वत:चा जीव धाेक्यात घालण्यासाेबत इतरांचा जीव काेणी धाेक्यात घालू नये.

पुण्यात वीकेंडला केवळ अत्यावश्यक सेवा सुरू
कोरोना थोपवण्यासाठी पुणे शहरात शनिवार अाणि रविवार केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार अाहेत. काेराेना रुग्णसंख्या सध्या कमी झाली असली तरी परदेशातील तिसऱ्या लाेटेचे स्वरुप पाहता खबरदारी घेणे गरजेचे अाहे. त्यामुळे सर्वानुमते काही बंधने अावश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाेबतच्या काेराेना अाढावा बैठकीत ठरल्याची माहिती खासदार गिरीश बापट यांनी पत्रकारांशी बाेलताना दिली.

बातम्या आणखी आहेत...