आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • 2 Thousand 192 Crore Funds Distributed In The Second Phase To Help Farmers Affected By Heavy Rains And Floods Vijay Vadettiwar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मदतनिधी:अतिवृष्टी, पुरामुळे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दुसऱ्या टप्प्यात 2 हजार 192 कोटींचा निधी वितरीत- विजय वडेट्टीवार

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे किमान 33 टक्के नुकसान झाले

जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत विविध जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नुकसान भरपाईच्या दुसऱ्या हप्त्यापोटी 2 हजार 192 कोटी 89 लाख 5 हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील मदत 2 हजार 297 कोटी 6 लाख रूपये नोव्हेंबर 2020 मध्ये वितरीत करण्यात आले होते . तर आता दुसऱ्या हप्त्यापोटी 2 हजार 192 कोटी 89 लाख 5 हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे किमान 33 टक्के नुकसान झाले आहे. अशा बाधित शेतकऱ्यांना शेतीपिकांच्या (जिरायत व आश्वासित सिंचनाखालील पिके) नुकसानीसाठी रु.10 हजार प्रती हेक्टर व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 25 हजार प्रती हेक्टर या दराने 2 हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचे निर्देश आहेत. या बाबतचा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser