आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

उस्मानाबाद:पाकिस्तानातील प्रेयसीला भेटण्यासाठी 20 वर्षीय तरुणाने बाईकवरुन गाठली पाक सीमा, बॉर्डर ओलांडण्याच्या तयारीत असताना बीएसएफ जवानांनी घेतले ताब्यात

उस्मानाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तरुणाने उस्मानाबादवरुन नगरमार्गे बाईकने भारत-पाकिस्तान सीमा गाठली

पाकिस्तानी तरुणीशी फेसबुकवर सूत जुळले. तिला भेटण्यासाठी आधी सायकलवरून उस्मानाबाद ते अहमदनगरचा २०० किमीचा प्रवास केला. त्यानंतर दुचाकीवर नगर ते गुजरातच्या कच्छ रणातील पाकिस्तानी सीमारेषेपर्यंत १ हजार िकमीचा प्रवास केला. मात्र वाळूत गाडी रुतल्याने ती तेथेच टाकून पायीच पाकिस्तानात जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या उस्मानाबादेतील झिशान सलीम सिद्दिकी या तरुणाला गुजरात पोलिस व बीएसएफच्या जवानांनी गुरुवारी ताब्यात घेतले. अनोळखी पाकिस्तानी प्रेयसीला भेटण्यासाठी हा प्रेमवीर थेट बॉर्डरवर पोहोचला होता. मात्र, कच्छच्या वाळवंटातल्या वाळूत त्याची स्वारी फसली.

उस्मानाबादच्या ख्वाजानगर भागात झिशान राहतो. त्याचे वडील मौलवी, तर आई साड्या विकण्याचे काम करते. झिशान शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांनी त्याला अभ्यासासाठी म्हणून लॅपटॉप घेऊन दिला. अभ्यास सोडून झिशान मात्र भलत्याच कामात अडकला.

अनोळखी ‘मदिना’ : फेसबुकवर ‘इस्माम की शहजादी’ ग्रुपवर झिशानची मदिना या पाकिस्तानी तरुणीशी ओळख झाली. दोघांनी कधी एकमेकांना पाहिलेलेही नाही, पण तिने बोलावले आणि झिशानने पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला.

झिशानच्या लॅपटॉपमधून पोलिसांना प्रेमकहाणीची माहिती कळाली. गुजरात पोलिसांशी संपर्क करून बीएसएफला माहिती दिली. झिशानला जवानांनी ताब्यात घेतल्याची माहिती गुजरात पोलिसांनी उस्मानाबाद पोलिसांना दिली.

११ जुलैपासून होता बेपत्ता

झिशान ११ जुलैपासून बेपत्ता होता. वडिलांनी नातेवाइकांकडे चौकशी केली, पण तो सापडला नाही. वडिलांनी तो हरवल्याची तक्रार पोलिसांत दिली. पोलिसांनी त्याचा लॅपटॉप ताब्यात घेत तो सायबर सेलकडे दिला आणि झिशानचा सुगावा लागला.

एटीएसचे पथक कच्छकडे रवाना

प्राथमिक माहितीनुसार सध्या तरी हे प्रेमप्रकरण वाटते आहे. झिशानला अटक केल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यासाठी उस्मानाबाद येथील पाच जणांचे एटीएसचे पथक कच्छकडे रवाना झाले आहे. पुढील चौकशीनंतरच खरे कारण स्पष्ट होईल. - राजतिलक रोशन, एसपी, उस्मानाबाद.