आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:मरसुळ शिवारात ऊसाच्या फडातून पकडला 1.20 लाख रूपये किंमतीचा 23 किलो गांजा, कुरुंदा पोलिसांची कारवाई

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांनी पाशू पठाण याच्या विरुध्द कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

वसमत तालुक्यातील मरसुळ शिवारात ऊसाच्या फडातून 1.20 लाख रुपये किंमतीचा 23 किलो गांजा कुरुंदा पोलिसांनी शुक्रवारी ता. 9 दुपारी पकडला आहे. या प्रकरणी पाशा दौलतखाँ पठाण याच्या विरुध्द कुरुंदा पोलिस ठाण्यात गुुन्हा दाखल झाला आहे.

मरसुळ शिवारात पाशा दौलतखाँ पठाण याच्या शेतातील ऊसाच्या फडात गांजाची झाडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, उपनिरीक्षक सविता बोधनकर, जमादार गजानन भोपे, तुकाराम आम्ले, प्रकाश नेव्हल, राठोड, पटवे, चव्हाण यांच्या पथकाने आज दुपारी मरसुळ शिवारात पठाण याच्या शेतातील ऊसाच्या फडात पाहणी केली. यावेळी ऊसामध्ये गांजाची झाडे असल्याचे आढळून आले. पोलिसांनी गांजाची 23 झाडे उपटून त्याचे वजन केले असता त्याचे वजन 23 किलो भरले आहे. या गांजाची किंमत 1.20 लाख रुपये आहे. पोलिसांनी पाशू पठाण याच्या विरुध्द कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...