आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंडारा:नागझिरा व्याघ्र प्रकल्पात 3 मजुरांचा होरपळून मृत्यू, अन्य दोन गंभीर जखमी

भंडारा2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अज्ञात व्यक्तीने जंगलात लावलेल्या आगीवर नियंत्रण मिळवताना त्यात होरपळून तीन हंगामी वन मजुरांचा मृत्यू झाला. अन्य दोन गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी सायंकाळी गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या नागझिरा आणि पिटेझरी या २ वनपरिक्षेत्रांत थाटेझरी-कोसमतोंडी गावालगत घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

राकेश युवराज मडावी (४०), रेखचंद गोपीचंद राणे (४५) आणि सचिन अशोक श्रीरंगे (२७) अशी मृतांची नावे आहेत. विजय तिजाब मरस्कोल्हे (४०), राजू शामराव सयाम (३०) अशाी गंभीर जखमी वनमजुरांची नावे आहेत. जखमींवर नागपूर येथील ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यातील थाटेझरी-कोसमतोंडी गावालगतच्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कक्ष क्रमांक ९७, ९८, ९९, १०० मध्ये अज्ञात व्यक्तीने गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आग लावली. ही आग विझविण्याच्या कामावर ५० ते ६० वनाधिकारी, वन कर्मचारी व हंगामी वनमजूर होते. दुपारी ४.३० च्या सुमारास आग आटोक्यात आली. मात्र, सायंकाळी वारा वाहू लागल्याने आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. दोन पहाडांच्या मधोमध असलेल्या दरीत हंगामी वनमजूर आग विझविण्याचे काम करत असताना या आगीने मजुरांना चारही बाजूंनी घेरले. या आगीतून एक वनमजूर स्वतःला वाचवत बाहेर आला. त्याने घटनेची माहिती तत्काळ वनाधिकाऱ्यांना दिली. आगीत अडकलेल्या वन मजुरांना बाहेर काढण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...