आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • 400 Colored Crabs Found In Latur District; In A Field In Masalga Village, 250 Nests Were Built By Birds That Have Been Living On An Acacia Tree For Five Years |marathi News

पर्यावरण दिनविशेष:लातूर जिल्ह्यात सापडले 400 रंगीत करकोचे; बाभळीच्या झाडावर पक्ष्यांनी बांधली 250 घरटी

लातूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रंगीत करकोची मोठी वसाहत सारंगागार (हेरॉनरी) निलंगा तालुक्यातील मसलगा तलावाच्या पाणथळ क्षेत्रात पक्षिमित्र धनंजय गुट्टे यांना आढळली. सध्या या बाभळीच्या झाडांवर २५० रंगीत करकोचांचे संसार त्यांच्या ४०० पेक्षा अधिक चिल्यापिल्यांसह सुखेनैव नांदत आहेत.

झाडांना कुऱ्हाड लावणार नाही
हे पक्षी ५ वर्षांपासून पाहत आहोत. त्याचा कसलाही त्रास आम्हाला व आमच्या शेतीला नाही. झाडांना कुऱ्हाड लावणार नाही, असे शेतकरी गुंडाप्पा धनुरे यांनी सांगितले.

पक्ष्यांची गणना
बीएनएचएसचे उपसंचालक राजू कसंबे, वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रामपुरे, वन परिमंडळ अधिकारी बिराजदार, जैवविविधता समितीचे सदस्य शहाजी पवार आदींनी पक्ष्यांची गणना केली.

बातम्या आणखी आहेत...