आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीरमने कोवीशील्डची किंमत केली कमी:राज्यांसाठी 400 ऐवजी 300 रुपयांना मिळेल लस, एका आठवड्यापूर्वीच ठरले होते नवीन दर

पुणे10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्राला 150 रुपयांना मिळते लस

भारतातील सर्वात मोठी व्हॅक्सीन निर्माता कंपनी सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाने कोवीशील्डची किंमत कमी केली आहे. कंपनीचे सीईओ अदार पुनावाला यांनी बुधवारी ट्वीटरवरुन याबाबत माहिती दिली.

पुनावाला म्हणाले की, राज्यांना कोवीशील्ड आता 400 ऐवजी 300 रुपयांना मिळेल. यामुळे राज्यांच्या हजारो कोटी रुपयांची बचत होईल. यातून ते जास्तीत-जास्त लस खरेदी करू शकतील आणि लोकांचे आयुष्य वाचवू शकतील.

केंद्राला 150 रुपयांना मिळते लस

21 एप्रिलला सीरमने व्हॅक्सीनच्या नवीन किमती ठरवल्या होत्या. तेव्हा खासगी रुग्णालयांसाठी लस 600 रुपयांना देण्याचे ठरले होते. यापूर्वी या रुग्णालयांना हीच लस 250 रुपयांना दिली जात होती. तेव्हा राज्यांसाठी दर 400 रुपये आणि केंद्रासाठी 150 रुपये होते.

एकूण प्रोडक्शनचा 50% राज्यांना दिला जातो

सीरममधून आता जितकी लस तयार होते, त्यातील 50% केंद्राच्या लसीकरण कार्यक्रमाला दिली जाते. उर्वरित 50% राज्य आणि खासगी रुग्णालयांना दिली जाते.

बातम्या आणखी आहेत...