आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादळांचा तडाखा:4 वर्षांत 5 वादळे; अरबी समुद्र आता बनले चक्रीवादळाचे केंद्र

अजय कुलकर्णी | औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यंदा मान्सूनचे आगमन लवकर होणार

अरबी समुद्र आता पूर्व मोसमी हंगामातील चक्रीवादळाचे केंद्र बनला आहे. गेल्या चार वर्षांत या समुद्रात पाच पूर्व मोसमी चक्रीवादळे अाल्याचे ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे म्हणाले., भारतीय उपखंडानजीकच्या समुद्रांत दरवर्षी सरासरी ५ चक्रीवादळे येतात. त्यापैकी ४ बंगालच्या उपसागरात, तर एक अरबी समुद्रात निर्माण होत असते. अरबी समुद्राच्या तुलनेत बंगालच्या उपसागराच्या पाण्याचे तापमान जास्त असल्याने तेथेे चक्रीवादळांसाठी अधिक अनुकूल वातावरण मिळते. गेल्या काही वर्षांपासून जागतिक तापमानवाढीमुळे पूर्व मोसमी हंगामात अरबी समुद्रात सातत्याने वादळांची नोंद झाली. गेल्या चार वर्षांत एरवी शांत समजणाऱ्या अरबी समुद्रात पाच पूर्व मोसमी चक्रीवादळांची नोंद झाली आहे.

तौक्ते खेचणार मोसमी वारे, यंदा मान्सूनचे आगमन लवकर होणार
तौक्ते वादळामुळे मोसमी वाऱ्यांचे प्रवाह भारतीय उपखंडाकडे खेचले जाण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे यंदा मान्सून लवकर येईल. -डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ

बातम्या आणखी आहेत...