आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

थकित वेतन:एसटी कर्मचाऱ्यांच्या थकित वेतनासाठी 550 कोटी रुपये मंजूर; परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. एसटी विभागातील कर्मचाऱ्यांच्या थकित वेतनासाठी 550 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी ट्विटरवरुन दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

अनिल परब यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, "माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार! उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 550 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार लवकरच होतील," अशी माहिती त्यांनी दिली.

0