आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:राज्याला म्यूकरमायकोसिसचा विळखा; आजपर्यंत 560 बळी, तर 6,600 रुग्ण; नागपूर, औरंगाबाद आणि नाशिकमध्ये सर्वाधिक बळी

नाशिक7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोग्यमंत्र्यांच्या घोषणा कागदावर

राज्यात आता म्यूकरमायकाेसिसचा विळखा वाढत चालला अाहे. राज्यात आतापर्यंत या आजाराने ५६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.एकूण रुग्णांची संख्या ६,६०० झाली असून सध्या ४,२९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सरकारने महात्मा फुले जीवनदायी योजनेत आजाराचा समावेश केला असला तरी याची लोकांना माहितीच दिली जात नसल्याचे “दिव्य मराठी’च्या पडताळणीत पुढे आले आहे.

नागपूर, औरंगाबाद व नाशिक हॉटस्पॉट
जिल्हा बळी सक्रिय रुग्ण
नागपूर १०४ मृत्यू ५९० रुग्ण
औरंगाबाद ६५ मृत्यू ४४० रुग्ण
पुणे ५२ मृत्यू ७२५ रुग्ण
नाशिक ४१ मृत्यू २९८ रुग्ण

उपचारांचा खर्च किमान १० लाख
या रुग्णांना शस्त्रक्रियेच्या अाधी व नंतर किमान १५ ते २० दिवस रुग्णालयात दाखल करावे लागत अाहे. उपचार पूर्ण होईपर्यंत एकेका रुग्णाला किमान ६० ते १०० इंजेक्शन्स लागतात. एका इंजेक्शनचा खर्च ७,८०० रुपयांपर्यंत आहे. उपचारांसाठी ८ ते १० लाख खर्च होतो.

आरोग्यमंत्र्यांच्या घोषणा कागदावर
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्यूकरमायकोसिसचा महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत समावेश केल्याची घोषणा केली. मात्र, योजनेबद्दल रुग्ण किंवा त्यांच्या नातलगांना माहितीच नाही. तसेच खासगी रुग्णालयेही माहिती देत नसल्याचे दिसून आले. सरकारी रुग्णालयांत माेजक्याच रुग्णांवर उपचार हाेत अाहेत. शस्त्रक्रियाही हाेत नाही. इंजेक्शनसाठी वणवण फिरावेच लागत अाहे.

बातम्या आणखी आहेत...