आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:हॉस्पिटल मध्ये लिप्ट कोसळुन 9 डॉक्टर गंभीर जखमी; पनवेलच्या हॉस्पीटलमध्ये झाला अपघात

रायगड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लिफ्ट कोसळून 9 डॉक्टर गंभीर जखमी झाल्याचा प्रकार पनवेलच्या हॉस्पीटल मध्ये उघडकीस आला आहे. हॉस्पीटल च्या लिफ्ट मध्ये बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. काही सेकंदातच लिफ्ट खालच्या मजल्यावर येऊन आदळली. या अपघातानंतर तात्काळ अग्निशमन दलातील जवानांना बोलवण्यात आले. फायर ब्रिगेडच्या लोकांनी डॉक्टरांची सुटका करत त्यांना हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल केले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

अपघात होण्याच्या आधी नेमके काय घडले?
रायगड जिल्ह्यात नवीन पनवेल शहरातील आमले हॉस्पिटलमध्ये लिफ्ट कोसळून 9 डॉक्टर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काही महिन्यांपूर्वीच सुरु करण्यात आलेल्या आमले रुग्णालयात डॉक्टरांसाठी गेट टूगेदरचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रुग्णालयाची पाहणी झाल्यावर तिसऱ्या मजल्यावरून 9 डॉक्टर खालच्या मजल्यावर जेवणासाठी निघाले. मात्र दुसऱ्या मजल्यावर पोहोचताच लिफ्टमध्ये बिघाड झाला आणि लिफ्ट काही सेकंदातच तळ मजल्यावर येऊन आदळली.

लिफ्टमधील सर्व 9 डॉक्टरांना दुखापत
उर्वरित डॉक्टरांनी अग्निशमन दलास बोलावले असता अग्निशमन दलातील माणसांनी तात्काळ या सर्व 9 डॉक्टरांना लिफ्टमधून बाहेर काढले. या दुर्घटनेत लिफ्टमधील सर्व 9 डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व डॉक्टरांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या घटनेची नोंद खांदेश्वर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...