आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये पार पडेल. साहित्यिकांसह साहित्य रसिकांच्या उपस्थितीत 22 ते 24 एप्रिल दरम्यान भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात सारस्वतांचा हा मेळा भरेल. ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे हे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असतील
भारत सासणे यांचा परिचय भारत जगन्नाथ सासणे एक आधूनिक लेखक व कथाकार आहेत. ते केवळ लेखकच नव्हे तर शासकीय अधिकारीही होते. त्यांनी शासनात विविध पदांवर काम केले. त्यांचा जन्म 27 मार्च 1951 रोजी जालना येथे झाला आहे. 1980 नंतरचा एक दमदार कथालेखक म्हणून त्यांना ओळखले जाते. नवकथेची सारी वैशिष्ट्ये आत्मसात करून त्यांनी आपल्या वेगळ्या धाटणीच्या कथा लिहिल्या. त्यांच्या लिखाणात पारंपरिकता व प्रयोगशीलता यांचे मिश्रण आढळते. सासणेंनी अदृष्ट, अनर्थ रात्र, अस्वस्थ, आतंक, आयुष्याची छोटी गोष्ट सारखी अनेक पुस्तके लिहिली आहेत. ग्रामीण आणि आदिवासी समाज जीवनातील विविध पैलू, स्वभावधर्म आणि माणसांचं चित्रण त्यांनी आपल्या लेखनातून रंगवले आहे.
विविध पुरस्कारांनी सन्मान भारत सासणे यांना लेखनाबद्दल राज्य शासनाचे उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचे पुरस्कार, तसेच इतरही अनेक मानाचे पुरस्कार मिळालेत. त्यांनी वैजापूरला 4 एप्रिल 2010 रोजी झालेल्या 5 व्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषवले आहे. बहिर्जी शिक्षण संस्थेतर्फे वसमत येथे 9-10 नोव्हेंबर 2014 या काळात आयोजित केलेल्या 35 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे नेतृत्वही त्यांनी केले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.