आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:जोगेश्वरीमधील एका रेस्तरॉवर पोलिसांचा छापा; अश्लील चाळे करणाच्या आरोपात 28 महिलांसह 97 जण ताब्यात

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांनी या सर्वांची मेडिकल तपासणी केली असता यातील अनेकजण नशेत असल्याचे समजले

मुंबईतील जोगेश्वरी परिसरात असलेल्या एका रेस्तरॉवर कोव्हिड-19 च्या नियमांचे उल्लंघन करणे आणि अश्लील चाळे करणाच्या आरोपात पोलिसांनी 28 महिलांसह 97 जणांना ताब्यात घेतले आहे. रविवारी(दि.16) झालेल्या या कारवाईत पोलिसांनी चौकशीनंतर महिलांना सोडले तर रेस्तरॉच्या मॅनेजरसह तीन वेटरला ताब्यात घेतले आहे.

सर्वजण नशेत होते

ओशिवारा पोलिस स्टेशनचे निरीक्षक दयानंद बांगर यांनी सांगितले की, लिंक रोडवरी 'बॉम्बे ब्रूट' रेस्तरॉमध्ये लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करत काहीजण पार्टी करत असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाली होती. यानंतर महिला पोलिसांसह 12 जणांच्या पथकाने या ठिकाणी छापा मारुन 97 जणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी या सर्वांची मेडिकल तपासणी केली असता यातील अनेकजण नशेत असल्याचे समजले. चौकशीनंतर महिलांना सोडून देण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी कलम 294 (सार्वजनिकरित्या अश्लील चाळे करणे), 188 (सरकारी आदेशाचे उल्लंघन करणे), 285 (ज्वलनशील पदार्थांचा वापर करणे) आणि महामारी रोग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...