आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हलगर्जीपणा:डॉक्टरऐवजी कंपाउडरने दिले इंजेक्शन, 16 वर्षीय मुलाचा दोन तासातच मृत्यू

वर्धा10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कुटुंबियांकडून रुग्णालयाची तोडफोड

सेलू तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी असलेल्या १६ वर्षीय मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने, त्याला १७ जून रोजी पहाटेच्या सुमारास झडशी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता, डॉक्टराच्या सांगण्यानुसार तेथील कार्यरत असलेल्या आरोग्य सेवकाने त्या मुलावर उपचार करताच त्याचा दोन तासातच मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना घडली असून,डॉक्टराला निलंबित करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार सेलू तालुक्यातील टाकळी (झडशी) येथील श्रेयस किशोर नवघरे या मुलाची  १७ जून रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास प्रकृती चिंताजनक असल्याने, त्या मुलाला झडशी येथील असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी निवासस्थानी असलेले डॉक्टर रविंद्र देवगडे  गैरहजर असल्याने तेथील कार्यरत असलेले आरोग्य सेवक ज्ञानेश्वर भगत याने डॉक्टरांना रुग्ण दाखल झाल्याची माहिती दिली. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार आरोग्य सेवकाने १६ वर्षीय मुलावर उपचार करिता त्याला इंजेक्शन देताच केंद्रातून सुट्टी देण्यात आली.

श्रेयस हा त्याचा वडिलांसोबत दोन किलोमीटर अंतरावर जाताच त्याचा दोन तासात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याप्रकरणी संतप्त झालेल्या कुटूंबियांनी मुलाचा मृतदेह आरोग्य केंद्रात आणत आरोग्य केंद्राची तोडफोड करीत बेजबाबदार डॉक्टर रविंद्र देवगडे ,आरोग्य सेवक ज्ञानेश्वर भगत या दोघांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केल्याने केंद्रात तणावाचे वातावरण पसरले होते.

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी अजय डवले यांना कळताच त्यांनी घटनेची माहिती घेत तात्काळ डॉक्टर रविंद्र देवगडे यांना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आले. त्यानंतर कुटूंबियांनी मुलाचा मृतदेह पोलिसांच्या स्वाधीन केला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आला. पुढील चौकशी सेलू पोलिस करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...