आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशांची बॅग पळविली:हिंगोलीत दुचाकीला अडकवलेली पावणे तीन लाखांची रोकड असलेली बॅग चोरट्यांकडून लंपास

हिंगोली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरातील खुराणा पेट्रोल पंपाजवळ पैसे पडल्याचे सांगत चोरट्यांनी दुचाकीला अडवलेली २.८० लाख रुपये असलेली बॅग पळविल्याची घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील मोंढ्यातील व्यापारी विक्रम अग्रवाल यांच्याकडे काम करणारे राजू बेंगाळ आज दुपारी आयसीआयसीआय बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. बँकेतून २.८० लाख रुपये काढून त्यांनी बॅगमध्ये ठेवले व बॅग दुचाकीला अडकवून मोंढ्यात निघाले होते. त्यांचे दुचाकी वाहन खुराणा पेट्रोप पंपाजवळ आले असताना त्या ठिकाणी थांबलेल्या एका चोरट्याने तुमचे दिडशे रुपये पडले असे सांगितले. त्यामुळे बेंगाळ यांनी दुचाकी थांबवून दिडशे रुपये घेण्याचा प्रयत्न केला. मात्र या संधीचा गैरफायदा घेत दुसऱ्या चोरट्याने दुचाकीला अडकवलेली पैशाची बॅग पळविली. यावेळी बेंगाळ यांनी मदतीसाठी आरडाओरड केली मात्र कोणाला काही लक्षात येण्यापुर्वीच चोरट्यांनी दुचाकीवरून पळ काढला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक पंडीत कच्छवे, उपनिरीक्षक नितीन केणेकर, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार गजानन होळकर, अस्लम गारवे, दिलीप बांगर, शेख मुजीब, शेख शकील यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

या परिसरातील दुकानांच्या बाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुजेट तपासणीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र चोरट्यांनी तोंडावर मास्क लावला असल्याने चोरट्यांची ओळख पटविण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. या प्रकरणात हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...