आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाड:5 मजली इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू तर 18 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली

विवेक ताम्हणकर | महाड/रायगड5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 10 वर्षे जुन्या तारिक गार्डन इमारतीत 50 फ्लॅट, 200 वर लोक राहत होते

रायगड जिल्ह्यातील महाड येथील काजलपुरा परिसरातील तारिक गार्डन ही ५ मजली इमारत सोमवारी संध्याकाळी ६.१५ वाजता कोसळली. यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. १९ जणांना ढिगाऱ्यातून वाचवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. १८ जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

१० वर्षे जुन्या आणि ५० फ्लॅट असलेल्या या इमारतीत २०० ते २५० जण राहत होते. अग्निशमन, एनडीआरएफकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. इमारतीचे ३ मजले कोसळले असल्याची माहिती पालकमंत्री अदिती तटकरेंनी दिली. इमारतीचे बिल्डर, आर्किटेक्ट व काँट्रॅक्टरवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

एका युजरने दुर्घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे

इमारतीचा पाया खचलेला होता : स्थानिक नागरिक

> ही पाच मजली इमारत सव्वासहा वाजता अचानक पत्त्यांसारखी कोसळली. यानंतर मोठ्या आवाजासह धुळीचे लोट आकाशात उडाले. इमारत कोसळल्याचे लक्षात येताच एकाच हाहाकार उडाला.

> स्थानिकांनुसार, निकृष्ट बांधकामामुळे या इमारतीचा पाया खचलेला होता. मात्र, त्याला अधिकाऱ्यांनी दुजोरा दिलेला नाही. एखादी इमारत तयारी करून पाडली जाते, अगदी तशीच ही इमारत जागच्या जागी बसली.

अवघ्या चार तासांमध्ये १०० तरुणांनी केले रक्तदान

जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अवघ्या ४ तासांत १०० वर तरुणांनी रक्तदान केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही एनडीआरएफच्या महासंचालकांशी बोलून मदत कार्याच्या सूचना दिल्या. मुख्यमंत्र्यांनीही स्थितीचा आढावा घेतला.

सुमारे १० मिनिटे डगमगत होती इमारत

कोरोनामुळे येथील बहुतांश रहिवासी घरांतच होते. जवळपास १० मिनिटे ही इमारत डगमगत होती. यानंतर इमारतीतील ७० वर जणांनी बाहेर धाव घेऊन जीव वाचवला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser