आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राचे दशरथ मांझी:घरात कित्येक वर्षापासून होती पाण्याची समस्या, वाशिम येथील एका व्यक्तीने आपल्या पत्नीसह 22 दिवसांत खोदली संपूर्ण विहीर

वाशिम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊनमध्ये गेली होती नोकरी

बिहारच्या दशरथ मांझी यांनी हातोडा आणि छिन्नीच्या मदतीने एक भला मोठा डोंगर तोडला होता. अशीच काहीशी एक घटना महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात घडली आहे. वाशिम येथील रहिवासी रामदास फोफळे यांनी यामाध्यमातून दशरथ मांझी यांच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. रामदास आणि त्यांच्या पत्नी दोघांनी आपल्या घरात 22 दिवसांत संपूर्ण विहीर खोदली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांना पाण्याची समस्या होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे रामदास यांनी सांगितले. ही बातमी आता संपूर्ण जिल्ह्यात वाऱ्याच्या वेगाने पसरली असून सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

स्वातंत्र्यानंतर येथे पाण्याची समस्या
वाशिम जिल्ह्यातील जामखेड येथील रहिवासी रामदास फोफळे भलेही दहावी नापास असतील. परंतु, त्यांचा हेतू हा एखाद‌या खडकापेक्षा कमी नाही. रामदास यांच्या गावात स्वातंत्र्यानंतरही पाण्याची समस्या होती. गावातील लोकांनी अनेक किलोमीटर दूर जाऊन पाणी आणावे लागत होते. परंतु, फोफळे कुटुंबियाच्या प्रयत्नाने त्याचे घर आणि घराशेजारील लोकांना पाण्याची समस्या मिटणार आहे.

लॉकडाऊनमध्ये गेली होती नोकरी
रामदास फोफळे हे गुजरातमधील एका कापड कंपनीत ड्रायव्हरचे काम करत होते. परंतु, लॉकडाऊनमुळे ते मार्च महिन्यात घरी आले. येताना सुरतहून साड्या आणल्या होत्या जेणेकरून त्या विकून आपल्या कुटुंबासाठी भाकरीची व्यवस्था केली जावी. तो काही दिवस साड्या विकून जगला, पण आता त्याच्या हाताला काहीच काम नाही आहे.

हाताला काम नसल्याने व घरात पाण्याची समस्या असल्याने त्याने त्यांच्या पत्नीसमोर हा विषय ठेवला. मग दोघांनी मिळून 22 दिवसात 25 फूट खोल विहीर खोदली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियाची पाण्याची समस्या मिटली आहे. परंतु, संपूर्ण गावाची समस्या मिटवायची झाल्यास 40 ते 50 फूट खोल विहीर खोदावी लागणार आहे.

विहीर खोदताना प्रकृती खालावली
रामदास यांनी सांगितले की, विहीर खोदताना माझी प्रकृती थोडी खालावली होती. परंतु, तरीदेखील आम्ही हिम्मत सोडली नाही. आता ठिक झाल्यावर हे काम पून्हा सुरु करण्यात आले आहे.

विहीरीच्या बांधकामासाठी लोकांजवळून घेतले कर्ज
रामदास फोफळे यांनी विहीरीच्या बांधकामासाठी लोकांजवळून कर्ज घेतले. त्यांच्याजवळ कोणतीही शेती किंवा हाताला काम नाही. फोफळे यांना दोन मुल असून त्यांनीदेखील कामात हातभार लावला होता.

बातम्या आणखी आहेत...